सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते – प्रा. डी. आर. माळी

editor 2 Min Read
2 Min Read

मेहकर (अनिल मंजुळकर) – शरीर सुदृढ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, कारण सुदृढ शरीर असेल तर या शरीरात सुदृढ मन वास करते, असे प्रतिपादन प्राचार्य डी. आर. माळी यांनी केले. स्थानिक जानेफळ येथील श्री सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये तालुका क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन, यामध्ये धावण्याच्या स्पर्धा, गोळाफेक व कबड्डी या स्पर्धांचा अंतर्भाव होता. १५ ते २५ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री सरस्वती शाळा समितीचे अध्यक्ष दिनुआप्पा मिटकरी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संचालिका श्रीमती किरणताई चांदणे, अजयसिंग राजपूत सहाय्यक व्यवस्थापक नेहरू युवा केंद्र बुलढाणा, प्राचार्य डी. आर. माळी, मुख्याध्यापिका अलका खंडेलवाल, उपप्राचार्य विजूक्ताचे जिल्हा अध्यक्ष शिवराम बावस्कर, पर्यवेक्षक रामदास धामोडकर, क्रीडा शिक्षक गोवर्धन राठोड, जानेफळ एक्सप्रेसचे निवासी संपादक कृष्णा हावरे, सरस्वती विद्यालयाचे शिक्षक पुरुषोत्तम शिंदे, किशोर पेटकर, प्रा गजानन जारे, अमोल धोटे, सचिन वाघमारे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार नंतर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा शिक्षक गोवर्धन राठोड, सौ चंदा शरद धोटे, मोहरील सर यांनी या स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले. दिवसभर विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नेहरू युवा केंद्र बुलढाणाचे सहाय्यक व्यवस्थापक अजयसिंग राजपूत यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोवर्धन राठोड तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे यांनी केले.

Share This Article
Exit mobile version