आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मयुरेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी परंपरेने धार्मिक उपक्रम, दिपप्रज्वलन, पुष्पहार करीत पुष्पांजली अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी श्रींची आरती झाली.
येथील श्रीकृष्ण मंदिर बिडकर वाडा येथे नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आळी. या निमित्त शहरात दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन उत्सहात झाले. श्रीकृष्ण मंदिरात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत परंपरेने साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त दीपप्रज्वलन पोपट बेदरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीकृष्ण मंदिरात सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेश बिडकर, राजेंद्र शहाणे, अनंत बेदरे, चंद्रकांत टाक, शरद पळसे, विनायक बेलापूरकर आदी उपस्थित होते. शहरातून नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त दुचाकी रॅली चे आयोजन उत्साहात करण्यात आले. श्रीकृष्ण मंदिरात बिडकर वाडा येथे पंडित महामुनी यांचे कीर्तन हरिनाम गजरात झाले. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. उमेश बिडकर यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

