सुटा, प्राचार्य संघटना, संस्थापक संघटना युतीचे व्यवस्थापन परिषदेवर वर्चस्व

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या निवडणुकीत सुटा, प्राचार्य संघटना व संस्थापक संघटना युतीने नऊ पैकी आठ जागा जिंकून व्यवस्थापन परिषदेसह इतर विविध समित्यांवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. तर संस्थापक गटातून वैशाली जितेंद्र साठे व स्थायी समिती मधून गणेश डोंगरे विजय झाले आहेत.

यापूर्वी युतीचे पाच उमेदवार व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी संस्थापक संघटनेच्या अध्यक्षा पद्मजादेवी मोहीते – पाटील, सचिव प्राचार्य डॉ जयप्रकाश बिले, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब देशमुख, सचिव डॉ राजेंद्र शेंडगे, सुटाचे अध्यक्ष डॉ. नेताजी कोकाटे, सचिव डॉ वशिष्ठ गुरमे, तिन्ही संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी उमेदवाराचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.


विजयी उमेदवार : व्यवस्थापन परिषद
सचिन मारुती गायकवाड (पदवीधर गट- सुटा )
डॉ. समाधान दिगंबर पवार (शिक्षक गट – सुटा )
विद्या परिषद : वैशाली जितेंद्र साठे (संस्थापक गट)
स्थायी समिती : गणेश दत्तात्रय डोंगरे (पदवीधर गट – सुटा ), डॉ सीमा अण्णासाहेब गायकवाड (शिक्षक गट – सुटा ) प्राचार्य डॉ कैलास जगन्नाथ करांडे (प्राचार्य गट)
तक्रार निवारण समिती : डॉ जैनुद्दीन खतालसो मुल्ला ( शिक्षक गट – सुटा ) सिद्धेश्वर बाबू स्वामी ( शिक्षकेतर गट )
…….

Share This Article
Exit mobile version