सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून जवळपास ११२ कोटी रुपये मिळाले आहे. त्यामुळे झेडपीची तिजोरी भरले असून, विकास कामांना मंजुरी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषदेने साडेचारशे कोटी रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी जवळपास २२५ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. प्राप्त निधी ११२ कोटी ३० लाख रुपये सध्या झेडपीच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे विकास कामांना कार्यारंभ आदेश देण्याचे काम सध्या झेडपीमध्ये जोमात सुरू आहे. हा निधी जिल्हा परिषदेच्या १० विभागांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये बांधकाम एक, बांधकाम दोन, कृषी, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, लघु पाटबंधारे महिला बालकल्याण पशुसंवर्धन आधी विभागाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेला २४५ कोटी रुपये मंजूर झाले तरी अद्याप पूर्णपणे निधी देण्यात आला नाही. जिल्हा परिषदेने जवळपास १६२ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले आहे. त्यामुळे प्राप्त निधी आणि वर्क ऑर्डर यामध्ये काही प्रमाणात तफावत आहे. तरी मार्च महिना अखेरपर्यंत झेडपीच्या खात्यावर पूर्ण निधी जिल्हा नियोजन समितीचा पडण्याची खात्री झेडपीच्या अधिकार्यांना आहे.
– अजयसिंह पवार, जिल्हा लेखा वित्त अधिकारी
—————-

