मुंबई (प्रतिनिधी) – राज्यांतील लाखो संघटीत कामगारांच्या कुटुंब आणि पाल्यांसाठी कल्याणासाठी वापरण्यात येणार्या आणि कामगार , मालक आणि शासन असे त्रिसदस्यीय जमा होणार्या निधीत दुपटीने वाढ करण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आस्थपनेतील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत दिले.
आता पर्यंत अर्धवेळ कर्मचारी ही अतिशय तूट पुण्य पगारामध्ये काम करत होते या कर्मचार्यांची पगारवाढीची अनेक दिवसांपासून ची मागणी होती अर्धवेळ असलेल्या कर्मचार्यांना किमान पूर्ण वेळ असलेल्या कर्मचार्यांच्या अर्धा पगार देण्यात यावा ही अगदी मागणी आमदार संस्थेचे महाले यांनी या बैठकीत मांडली त्यासाठी सुद्धा कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे यांनी अनुकूलता दर्शविली आहे . त्यासाठी सुधारीत आराखडा तयार करावा लागणार असून, सुधारित आराखडा हा सुधारीत भरण्यात येणार्या निधीच्या तुलनेत तयार करण्याच्या सूचना यावेळी ना कामगार मंत्री यांनी दिल्याने आ. सौ श्वेताताई महाले पाटील यांनी राज्यांतील कोट्यावधी कामगार व त्याचे कुटुंबीय यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच या व्यतिरिक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विवीध मागण्यांबाबत चर्चा करण्यात येऊन त्यावर सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले आहे. सदर बैठकीत आ. भाई जगताप तसेच कामगार आयुक्त रविराज इळवे तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कृती समितीचे पदाधिकारी सौ. ऊर्मिला सातपुते श्री. प्रल्हाद बांडे, सौ.उज्वला जाधव, सौ.मनिषा कावरे, श्री.गजानन आरु, सौ. सुजाता जाधव , सौ.ज्योती शिंदे, सौ.शुषमा नागोशे, श्री.अमोल कुडाळ हे सदस्य उपस्थित होते.

