आ. श्वेता महाले यांची भाजपच्या पॅनेलिस्ट तज्ज्ञ सदस्यपदी नियुक्ती

editor 2 Min Read
2 Min Read

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नऊ प्रवक्त्यांसह भाजपच्या एकूण ३१ पॅनलिस्ट तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीत चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची पॅनेलिस्ट सदस्य म्हणून वर्णी लागली असून, त्या भाजपच्या बाजू माध्यमांसमोर मांडतील. विशेष बाब म्हणजे, गेली १५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, केशव उपाध्ये हे मुख्य प्रवक्ते पदावर कायम आहेत. त्याच्या जोडीला विश्वास पाठक व अजित चव्हाण यांना सहप्रवक्ते बनविण्यात आलेले आहे.

 – प्रवक्ते –
आ. प्रा.राम शिंदे (प्रवक्ता)
आ. राम कदम (प्रवक्ता)
आ. अमित साटम (प्रवक्ता)
भालचंद्र शिरसाट (प्रवक्ता)
शिवराय कुलकर्णी (प्रवक्ता)
श्वेता शालिनी (प्रवक्ता)
गणेश खणकर (प्रवक्ता)
अ‍ॅड.राजीव पांडे (प्रवक्ता)
प्रेरणा होनराव (प्रवक्ता)

– पॅनेलिस्ट सदस्य –

खा. डॉ. अनिल बोंडे (अमरावती), आ. निरंजन डावखरे (ठाणे) आ. प्रवीण प्रभाकर दटके (नागपूर), आ. सिध्दार्थ शिरोळे (पुणे), आ. श्वेता महाले (चिखली, बुलढाणा), गणेश हाके (लातूर), अवधूत वाघ (मुंबई), राम कुलकर्णी (बीड), प्रवीण घुगे (औरंगाबाद), धर्मपाल मेश्राम (नागपूर), लक्ष्मण सावजी (नाशिक), मिलींद शरद कानडे (नागपूर), विनोद वाघ (वाशिम) असिफ भामला (मुंबई), मकरंद नार्वेकर (मुंबई), प्रदीप पेशकार (नाशिक), दीपाली मोकाशी (मीरा भाईंदर), विनायक आंबेकर (पुणे).
शिवानी दाणी (नागपूर), अ‍ॅड. आरती साठे (मुंबई), प्रो. आरती पुगांवकर (मुंबई), नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर), प्रीती गांधी (मुंबई), राणी द्विवेदी-निघोट (मुंबई), श्वेता परुळकर (मुंबई), राम बुधवंत (औरंगाबाद), अली दारुवाला (पुणे), चंदन गोस्वामी (नागपूर), आशीष चंदारमा (अकोला), देवयानी खानखोजे (मुंबई), मृणाल पेंडसे (ठाणे).
——————-

Share This Article
Exit mobile version