कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

editor 1 Min Read
1 Min Read

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत असलेल्या सेराफ्लेक्स या केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून, या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण कंपनीला या आगीने गिळंकृत केले. सध्या आग आटोक्यात आली असून अग्निशमन दलाच्या अनेक बंबांद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. यावेळी कंपनीतील कामगारांना आणि नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं होत.यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीचे लोळ इतक्या मोठ्या प्रमाणात होते की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरूनही स्पष्टपणे दिसत होते. बाजूलाच कोल्हापूर विमानतळ असल्याने विमान सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आगीत ही संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. कंपनी आग लागल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीलाही आग लागण्याची शक्यता होती. आगीवर नियंत्रण मिळवाता बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली होती.

Share This Article
Exit mobile version