हिवरा आश्रम येथे आज दुपारी भव्य महाप्रसाद वितरण

editor 1 Min Read
1 Min Read

हिवरा आश्रम (संतोष थोरहाते) – निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्यावतीने युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘विवेकानंद जन्मोत्सव सोहळा’ हिवरा आश्रम (विवेकानंद नगर) येथे विविध धार्मिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. या सोहळ्याची सांगता, आज (दि.१४) रोजी दुपारी भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे. राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. शंभर ट्रॅक्टरद्वारे, दीड हजार कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या सहाय्याने शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वितरण दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

तब्बल १५१ क्विंटलची गहूपुरी, १०५ क्विंटल वागेभाजीच्या वैदर्भिय चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आज सकाळपासून हजारो भाविक हिवरा आश्रमाकडे रवाना झाले आहेत. हा महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी पहाटे ब्रम्हमुहुर्तावर प्रारंभ झाला होता. तब्बल १५ तासांच्या पाकसिद्धीनंतर महाप्रसाद तयार केला गेला. महाप्रसाद निर्मितीच्या कार्यात हजारो स्वयंसेवकांनी योगदान दिले. आज (दि.१४) दोन ते पाच वाजेदरम्यान भव्य महाप्रसाद वितरणाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

Share This Article
Exit mobile version