– रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंना पदके देवून गौरव
कर्जत (प्रतिनिधी) -रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी ६५ किलो व ७२ किलो वजनी गटातील कुस्त्या संपन्न झाल्या. चार मॅटवर होत असलेल्या लढती अत्यंत रोमहर्षक होत असून, काही लढती पूर्णवेळ एकमेकाला लढवत अत्यंत चुरशीच्या होत आहेत, तर काही लढतीत क्षणाचा विलंब न लावता डाव टाकत विजय संपादन केला जात आहे. दिवसभर दोन सत्रात खेळवल्या जात असलेल्या या स्पर्धेत आज दोन गटाच्या लढती पार पडल्या. ६५ व ७२ किलो वजनी गटातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले.
शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी ५३ किलो, ५७ किलो, ६२ किलो वजनी गटात रोमहर्षक कुस्त्या संपन्न झाल्या होत्या यामध्ये ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती- मिनाक्षी, महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक, रौप्य पदक विजेती- प्रियांशी, रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ मध्य प्रदेश, व कांस्यपदक विजेती स्विटी, गुरूनानक विद्यापीठ अमृतसर व स्वाती, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना पदके मिळाली. ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती रजनी, गुरूनानक देव विद्यापीठ, रौप्यपदक विजेती कर्जतची भूमिकन्या सोनाली मंडलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व कांस्य पदक विजेत्या कल्पना, छ.बन्सीलाल विद्यापीठ भिवानी व निकिता, महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक यांनी पदके मिळवली. ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती निकिता, दिल्ली विद्यापीठ, रौप्य पदक विजेती प्रिâडम यादव व कांस्य पदक मिळविणार्या सृष्टी भोसले, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सुमन, गुरू जांभळेश्वर विद्यापीठ हिसार यांनी पदके मिळवली. ५३,५७ व ६२ या वजनी गटातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे पदके देवून सन्मानित करण्यात आले. पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याला बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार, कर्जतच्या नगराध्यक्ष सौ. ऊषाताई राऊत, मंजुषाताई गुंड, कर्जत नगरपंचायतच्या नगरसेवक, नगरसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
————–

